खामगाव | प्रतिनिधी | मराठवाडा टाइम्स
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सेंट्रल बँकेत कर्जमाफीच्या यादीवरून मोठा वाद निर्माण झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी बँकेचे व्यवस्थापक शिवाजी कड यांना कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे बँक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जमाफीच्या लाभार्थी यादीबाबत विचारणा करण्यासाठी काही शेतकरी बँकेत गेले होते. यावेळी बँक व्यवस्थापकांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करत वाद वाढला. वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी बँक व्यवस्थापक शिवाजी कड यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे कर्जमाफी प्रक्रियेतील अडचणी आणि शेतकऱ्यांच्या नाराजीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस तपासानंतर पुढील कारवाई होणार आहे.
मराठवाडा टाइम्स | Marathwada Times
मराठी ताज्या बातम्या | महाराष्ट्र | राजकारण | शेती | कर्जमाफी | सरकारी योजना | ब्रेकिंग न्यूज | Maharashtra News | Marathi News | Breaking News
Tags:
महाराष्ट्र