बुलढाण्यातून उभी राहिलेली 'We Read' वाचन चळवळ; हजारो वाचकांना जोडणारा मोईन ह्युमनिस्ट यांचा प्रेरणादायी प्रवास..

 बुलढाणा | मराठवाडा टाइम्स

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहता पुस्तक वाचनाची सवय कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथील मोईन ह्युमनिस्ट (Moin Humanist) यांनी या परिस्थितीत वाचनसंस्कृतीला नवी दिशा देण्यासाठी 'We Read' ही वाचन चळवळ उभी केली आहे. या उपक्रमातून दर्जेदार पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवणे, वाचनाची आवड निर्माण करणे आणि विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्याचे काम सुरू आहे.

मोईन ह्युमनिस्ट यांनी लॉकडाऊनच्या काळात 'Study Bunker' या मोफत कम्युनिटी लायब्ररीची स्थापना केली. येथे कोणालाही विनामूल्य येऊन पुस्तके वाचण्याची सुविधा उपलब्ध आहे. या उपक्रमाची दखल BBC मराठीने घेत त्यांच्या कार्यावर विशेष माहितीपटही तयार केला आहे.


याच उपक्रमातून पुढे 'We Read' या वाचन चळवळीचा जन्म झाला. या माध्यमातून दररोज विविध पुस्तकांची माहिती, पुस्तक परीक्षणे, वाचनासाठी शिफारसी तसेच सवलतीच्या दरात पुस्तकांची घरपोच सेवा दिली जाते. नवीन, अनुवादित आणि दुर्लक्षित साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर दिला जात आहे.

मोईन ह्युमनिस्ट यांच्या वाचनप्रेमाची दखल घेत लेखक शरद तांदळे यांनी त्यांना 'स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार' प्रदान केला होता. तसेच ई-सकाळ आणि BBC मराठीसारख्या माध्यमांनीही त्यांच्या कार्याची नोंद घेतली आहे.

सध्या We Read च्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कामगार, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील वाचक जोडले गेले आहेत. त्यामुळे हा उपक्रम केवळ पुस्तक विक्रीपुरता मर्यादित न राहता वाचनसंस्कृती रुजवणारी एक सामाजिक चळवळ म्हणून विकसित होत आहे.

We Read चे प्रमुख उपक्रम

Study Bunker – मोफत कम्युनिटी लायब्ररी

Moin's Shelf – पुस्तक परीक्षणे व वाचनविषयक लेखन

We Read Bookstore – निवडक पुस्तकांची घरपोच सेवा

उपक्रमाचे ध्येय स्पष्ट आहे – "प्रत्येक हातात एक पुस्तक, प्रत्येक मनात एक विचार आणि प्रत्येक समाजात एक परिवर्तन."


मराठवाडा टाइम्स | Marathwada Times
मराठी ताज्या बातम्या | महाराष्ट्र | राजकारण | शेती | 
 | ब्रेकिंग न्यूज | Maharashtra News | Marathi News | Breaking News

Post a Comment

Previous Post Next Post