महाराष्ट्रात पुढील २४ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट



मुंबई | मराठवाडा टाइम्स

भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच अकोला, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

या भागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून काही ठिकाणी २०० मिमीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


– मराठवाडा टाइम्स

Post a Comment

Previous Post Next Post