बदनापूर (जालना) प्रतिनिधी:
एकीकडे राज्य सरकार शिक्षण व्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध योजना आणि डिजिटल वर्गखोल्यांच्या घोषणा करत असताना, दुसरीकडे ग्रामीण भागातील वास्तव मात्र अत्यंत विदारक असल्याचे समोर येत आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव (सा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची प्रचंड दुर्दशा झाली असून, पावसाचे पाणी थेट वर्गात साचल्याने विद्यार्थ्यांना छता छताने गळणाऱ्या पाण्यात बसूनच शिक्षण घ्यावे लागत आहे.
नेमका प्रकार काय?
सध्या परिसरात मान्सूनचा पाऊस सुरू आहे. डोंगरगाव (सा ) येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे पत्रे आणि छत अत्यंत जुने व मोडकळीस आले आहे. पावसाळ्यात छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने संपूर्ण वर्गखोल्यांमध्ये पाणी साचले आहे.
* पाण्यात बसून धडे: वर्गातील बाकड्यांवर, तर काही ठिकाणी जमिनीवर साचलेल्या पाण्यातच दप्तरे वाचवत विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे.
* पुस्तके व साहित्याची नासाडी: छतातून थेट पाणी पडत असल्याने विद्यार्थ्यांची पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्य भिजून खराब होत आहे.
* अपघाताची भीती: जुन्या इमारतीच्या भिंती आणि छत ओलाव्यामुळे कमकुवत झाले असून, एखादी दुर्घटना घडण्याची भीती पालक आणि शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
Tags:
जालना