जाफराबाद | प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यातील युवा लेखक समाधान नवले पाटील यांनी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय पाऊल टाकत "With Her and Without Her" (English Edition) तसेच "तिच्यासह आणि तिच्याविना" (Marathi Edition) या भावस्पर्शी प्रेमकथा ॲमेझॉन किंडल (Amazon Kindle) या जागतिक ई-बुक प्लॅटफॉर्मवर प्रकाशित केल्या आहेत.
न बोललेल्या प्रेमाची वेदना, आठवणींचा प्रवास आणि आयुष्यभर मनात जिवंत राहणाऱ्या नात्यांची हळवी कहाणी या कादंबरीत मांडण्यात आली आहे. वास्तववादी कथानक, भावनिक संवाद आणि हृदयाला स्पर्श करणारी मांडणी यामुळे ही कादंबरी प्रेमकथा वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाला आपलीशी वाटेल, असा विश्वास लेखकाने व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे, एकाच कथेला इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रकाशित करून लेखकाने जागतिक तसेच मराठी वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही कादंबऱ्या Amazon Kindle Store वर उपलब्ध असून भारतासह विविध देशांतील वाचक त्या ऑनलाइन वाचू किंवा खरेदी करू शकतात.
यापूर्वी सामाजिक, राजकीय आणि समकालीन विषयांवर लेखन करणारे समाधान नवले पाटील यांनी आता साहित्य क्षेत्रातही दमदार पदार्पण केले असून त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Samadhan Navle Patil
पुस्तक पाहण्यासाठी खालील लिंक -
मराठी एडिशन - Click Here
इंग्लिश एडिशन - click Here