मराठवाडा टाइम्स | विशेष
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे, शांततापूर्ण आंदोलनातून लाखो समाजबांधवांना एकत्र आणणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे.
गेल्या काही वर्षांत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी राज्यभर जनजागृती करत विविध आंदोलने केली. उपोषणे, सभा आणि संवादाच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आंदोलनाची दखल राज्यभर तसेच देशभरात घेतली गेली.
मराठवाडा टाइम्स परिवारातर्फे मनोज जरांगे पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
– मराठवाडा टाइम्स परिवार
www.marathwadatimes.com
Tags:
महाराष्ट्र