जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांची समाधान नवले पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट

जालना | प्रतिनिधी

युनायटेड ग्लोबल फेडरेशनचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते समाधान नवले पाटील यांनी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान शाळा दत्तक प्रकल्प, शैक्षणिक साहित्य वितरण, महिला सक्षमीकरण, ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेले उपक्रम तसेच भविष्यात जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या नव्या योजनांबाबत विचारविनिमय करण्यात आला.

जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. त्यांच्या सूचनांमुळे आगामी काळातील उपक्रमांना अधिक दिशा मिळणार असल्याचे समाधान नवले पाटील यांनी सांगितले.

युनायटेड ग्लोबल फेडरेशनतर्फे भविष्यातही जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
समाधान नवले पाटील जालना जिल्हा कलेक्टर सोबत

Post a Comment

Previous Post Next Post